खेड : तालुक्यातील तिसंगी खोपकरवाडी ते कुळवंडी या गावांना जोडणा-या डुबी नदीवर नवीन पुल बांधण्यात यावा. या मागणीचे निवेदन तिसंगीवासिय ग्रामस्थांनी राज्याचे गृहराज्य मंत्री ना योगेशदादा कदम आणि शिवसेना नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या लेखी निवेदनद्वारे मागणीवजा साकडे घातले असुन, हा पुल झाल्यास तिसंगीवारिय ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. कारण सध्याचा पुल मृत्युचा सापळा बनला असून, अशा नादुरुस्त पुलावरुन येजा सुरु ठेवल्यास मोठी किंमत मोजावी लागणार आहे. म्हणूनच नवीन पुलाची मागणी तिसंगीवारिय ग्रामस्थांनी केली आहे.
तिसंगी आणि कुळवंडी गावाच्या मधुन वाहणा-या डुबी नदीपात्रातील सध्याच्या नादुरुस्त पुलावरुन अनेक ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरून ये जा करीत आहेत. हाच पुल तिसंगी- कुळवंडी गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी येजा करण्यासाठी उपयोगी पडत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुला संरक्षण कठडे किंवा साईडपट्टी नाही. हा पुलं येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या दृष्टीने दळणवळणाचा मार्ग आहे. पावसाळ्यात याच पुलाच्या मध्यभागी चिखल व माती साचत असल्याने पुलावरील रस्ता निसरडा होत आहे. अशा प्रकारे धोकादायक पुलावरुन येजा करणे म्हणजेच अपघाताला आणि ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण होण्यास आमंत्रण देणारा ठरणार आहे. पुल अरुंद असल्याने, अशा परिस्थितीत पुलावरुन
येता जाताना विद्यार्थी कडेकडेने वाटचाल करतात, अशी वाटचाल करताना तोल गेल्यास थेट नदी पात्रात पडण्याची भिती वर्तवली जात आहे. अशा प्रकारे वाटचाल करणे म्हणजेच तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण आणि उपविभाग खेड यांनी तसेच जि प. बांधकाम विभाग खेड यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून मोठी जिवितहानी होण्यापेक्षा नवीन पुलाच्या बांधकामाला प्राधान्य देऊन, नवीन पुलाच्या बांधकामास अग्रक्रम देऊन वा निधीची तरतूद गृहराज्य मंत्री ना योगेशदादा कदम आणि शिवसेना नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी पुलाच्या नवीन बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून डुबी नदीवरील नवीन पुलास मंजुरी देऊन नवीन पुलाच्या कामाला चालना द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.