रत्नागिरी : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील सुमारे 75 टक्के भाग दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत अशा महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या उपलब्धतेसाठीही विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
हे आहेत तालुके –
रायगड: श्रीवर्धन.
रत्नागिरी: संगमेश्वर, राजापूर.
सिंधुदुर्ग: सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
नाशिक: मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.
धुळे: धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.
जळगाव: एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
नंदुरबार: अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.
अहिल्यानगर: नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.
पुणे: भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.
सोलापूर: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
सांगली: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ.
सातारा: सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
कोल्हापूर: पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
जालना: बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद.
बीड: बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
लातूर: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.
धाराशिव: धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा.
नांदेड: नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.
परभणी: पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
हिंगोली: हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.
बुलढाणा: जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.
अमरावती: अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
अकोला: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.
वाशिम: वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा.
यवतमाळ: यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.
वर्धा: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.
नागपूर: नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
भंडारा: भंडारा, पवनी, लाखांदूर.
गोंदिया: तिरोडा.
चंद्रपूर: चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा.
गडचिरोली: गडचिरोली, चामोर्शी.