मुंबई :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली एसयूव्ही आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) करण्यात आला असून, यासंदर्भातील खटला विशेष NIA न्यायालयात सुरू आहे. सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.