खेड : रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करून येथील शेतकऱ्यांना भरीव मिळावी, अशी आग्रही मागणी राष्ट्र‌वादीचे जिल्हा सरचिटणीस जलालुद्दीन राजपुरकर यांनी येथील प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे.
खेड तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ असून येथील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे जरी येथे पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी येथील मातीमध्ये पाणी शोषुन ठेवण्याची क्षमता कमी आहे. येथील शेती हि उभ्या पावसावर अवलंबून आहे. तसे पाहता ८०% शेती हि सुकाडी असून २०% शेती पाणथळ आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने फुटवीच्यामध्ये आलेली शोती पाण्या‌अभावी कमकुवत झाली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच उत्तर रत्नागिरीतील खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने भातशेती धोक्यात आली आहे. राज्यात २८४ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थतीचा आढावा सुरु असताना खेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तरी खेड तालु‌का दुष्काळी जाहिर करुन शेतक-यांना भरीव मदन मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जलालुद्दीन राजपुरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.