खेड : येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालयातील त्यांच्या ” दायित्व उपक्रमाचे ” प्रमुख ॲड. दिलीप चव्हाण यांनी नुकतेच जि. प. पू. प्राथमिक शाळा करटेल मध्ये जाऊन “अभ्यास कौशल्य विकसन ” कार्यशाळा घेतली.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने कशी बघावीत, हळूहळू ती कृतीत कशी उतरावीत, त्याचप्रमाणे अभ्यास, खेळ आणि छंद कसे जोपासवेत. याविषयी खेळीमेळीच्या वातावरणात ॲड. चव्हाण यांनी साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहवास नोंदविला.
अशी कार्यशाळा महिन्यातून एकदा तरी घेतली जावी असे मत करटेल गावचे पोलीस पाटील आकेश येलवे, सरपंच दिनेश चव्हाण आणि ग्राम पंचायत सदस्य श्रीकांतभाऊ चव्हाण यांनी ॲड. दिलीप चव्हाण यांच्याकडे व्यक्त करून ॲड. दिलीप चव्हाण यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा” विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक सुरसिंग ठाकरे यांनी ॲड. दिलीप चव्हाण आणि सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांना धन्यवाद देताना म्हणाले. कार्यशाळेची माहिती शिक्षिका सुरेखा शेळके यांनी उपस्थितांना समजावून सांगितली, तर शिक्षक मधुकर साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जि. प. पु. प्राथमिक शाळा कर्टेलमध्ये अभ्यास कौशल्य विकसन कार्यशाळा संपन्न…
