चिपळूण : मोरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. संचिता सचिन जाधव यांच्या ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची नालंदा ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणातून दखल घेण्यात आली. पुणे येथे झालेल्या ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’मध्ये त्यांचा ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरव करण्यात आला.
या गौरवाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सौ. संचिता जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, ज्येष्ठ शिवसैनिक व मार्गदर्शक बाबाभाई शिंदे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, विभागप्रमुख सुरेंद्र (बाबा) शिंदे, मंगेश कोकीरकर, युवासेना विभागप्रमुख विशाल (भाई) परकर यांच्यासह सचिन जाधव उपस्थित होते.
मोरवणेच्या विकासकामाची राज्यस्तरीय व्यासपीठावर झालेली दखल ही गावासाठी अभिमानाची बाब असून, सौ. जाधव यांच्या पुढील ग्रामविकासाच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा, अशी भावना तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी व्यक्त केली.
