खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इयत्ता 11 वी. कॉमर्स मधील विद्यार्थी सफदर पांगारकर व गार्गी बाकळकर यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 व 03 ऑक्टोबर 2026 रोजी वारणानगर येथे झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. या यशाबद्दल सफदर, गार्गी आणि त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षक पर्यवेक्षक संतोष भोसले, आडाव, चव्हाण यांचे संस्था व प्रशालेतर्फे हार्दिक अभिनंदन करून, या दोन्ही खेळाडूंची पुढे 07 ते 09 ऑक्टोबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सफदर व गार्गी यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.