मुंबई : बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया गतिमान करून प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी बांधकाम कामगारांची प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण व लाभविषयक प्रकरणांचा आढावा घेतला. तसेच जुने दिव्यांग लाभ, मयत लाभ वाटप आणि त्यासंबंधीच्या चौकशी अहवालाची माहिती घेतली.

यावेळी अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, उपसचिव दीपक पोकळे आदी अधिकारी उपस्थित होते.