खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील नातुनगर मोहल्ल्या येथे मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक एमएच 46 CE 2238 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक दिपक मुरलीधर पाल वय 28 रा. न्हावाशिव, मुंबई हा जखमी झाला असून, जखमी कंटेनर चालकास नरेंद्राचार्य नाणीजधाम 24 तास रुग्णवाहीकेचा चालक सुरेश हंबीर हे आपली रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी दाखल होत, जखमी कंटेनर चालक पाल यास कळबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, जखमी कंटेनर चालक पालवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

हा अपघात शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 01.50 वाजण्याच्या सुमारास घडला असुन, या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.