लांजा: तालुक्यातील गोविळ गुरवगाव येथून ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रमेश सिताराम गुरव (वय ४२, रा.गोविळ गुरवगाव, ता.लांजा) यांनी याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांची आई सरिता सिताराम गुरव (वय ६५) हिला घरातून कोणालाही न सांगता पाहुण्यांकडे जाण्याची सवय आहे. यापूर्वी देखील ती दोन वेळा अशाच प्रकारे घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती.याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत.