मंडणगड : देव्हारे येथील ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील यांनी ‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी सहकार्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवाकार्याची दखल; घेवुन सेवा संकल्प’ अभियानांतर्गत देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच आयोजीत कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. महसुली कामकाजासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक कागदपत्रे, विविध दाखले आणि शासकीय प्रक्रियेसंदर्भात सहकार्य व मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या कार्याची यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. नागरिकांना महसूल सेवा देताना कर्तव्यनिष्ठा जपत विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात देणारे अमोल पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“सेवा ही केवळ पदाची जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव समाजासाठी प्रेरणादायी ठरो,” असे प्रतिपादन अभिजीत देवळेकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमास देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विष्णू बडे, प्राध्यापक कुंडलिक यादव, प्रशांत उगले, दत्तात्रय कदम, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.