मंडणगड – उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघटनात्मक पातळीवर आलेली मरगळ झटकून नव्याने बांधणी करीत सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी पक्ष रस्त्यावर उतरुन काम करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेने उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनिष पाथरे यांनी मंडणगड येथे केले. मनसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्त झालेल्या श्री. पाथरे यांनी 29 ऑक्टोंबर 2026 रोजी तालुक्यांचा दौरा केला. स्थानीक कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह भिंगळोली येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा घेऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेते आगामी कळातील पक्ष कोणत्या पध्दतीने वाटचाल करेल या बद्दल मार्गदर्शन केले व पत्रकारांशी संवाद साधला या सभेस तालुका अध्यक्ष नवज्योत गौड, मुश्तकिम कारविणकर, किरण धामणे, तेजस घस्ते व तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले स्थानीक राजकारणातील विरोधकांची पोकळी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानीक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबुत करण्यावर लक्ष दिले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, स्थानीक मतदारसंघाचे प्रश्न व कोकणचे प्रश्न हे पक्षाचे अग्रक्रमाचे मुद्दे आहेत.

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराकडे तरुणाई आकृष्ठ झालेले आहे कार्यकर्त्यांमध्ये कामाची मोठी उर्जा असून त्यांना बळ देण्याचे काम आगामी काळात केले जाईल कोकणचा पर्यावरण पुरक समस्य विकास हा आमच्याकरिता अग्रक्रमाचा मुद्दा आहे. स्थानीक तरुणांचे रोजगारांसाठी मुंबई व पुणे या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना रोजगार व जमीन खेरदीसाठी कोकणात येणार परप्रांतीयांचे लोंढे आमच्या चितेंच्या विषय आहे ते थांबवण्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करण्याचा प्रयत्न आहे. येथील तरुणांना स्थानीक पातळीवर योग्य पध्दतीने रोजगार उपलब्ध होईल येथील पर्यावरण व संस्कृती टिकून राहील या करिता विकासाकडे सत्ताधाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष आमच्या चितेंच्या विषय आहे स्थानीक पातळीवर उद्योग व रोजगार निर्माण करताना सत्ताधाऱ्यांनी पांरपारीक कार्यपध्दतीत मोठे बदल करीत अंगीकारलेली धोरणे, प्रदुषणास कारणीभुत ठरणारे प्रकल्प व कोकणाबद्दल शासनाचे उदासीन धोरण यावर भाष्य करताना आगामी काळात सत्ताधाऱ्यांना रितसर मार्गाने प्रश्न विचारले जातील असे प्रतिपादन केले. मध्यतरीच्या काळात संघटनेला आलेली मरगळ दुर करुन कार्यकर्त्यांना बळ देत युवा वर्ग पक्षाशी जोडण्यासाकरिता प्रत्येक तालुक्याच्या कामाची दिशा ठरविणार असल्याचे यावेळी सांगीतले.