चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पहिल्या अमृत भारत एक्स्प्रेसला चिपळूणसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.एरोड–उधना वन-वे स्पेशल (06197) ही 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8.15 वाजता एरोडहून सुटून 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता उधना येथे पोहोचणार आहे.
चिपळूण येथे या गाडीचे सकाळी 8.50 वाजता आगमन आणि 8.52 वाजता प्रस्थान होईल.कारवार,मडगाव, थिविम,सावंतवाडी रोड, कणकवली,रत्नागिरी,संगमेश्वर रोड,चिपळूण,खेड,माणगाव आणि रोहा येथेही थांबे आहेत.चिपळूणला अमृत भारतचा थांबा स्वागतार्ह आहे.आता प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळूण येथे थांबा आणि सर्वसामान्यांची रत्नागिरी–दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली.
