मंडणगड : युवासेना मंडणगड तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाप्रमुख विकास पवार यांच्या अध्यक्षतेखाली २७ऑक्टोबर ०२६ रोजी शासकीय विश्राम गृह भिंगळोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, तालुक्यातील युवकांना संघटनेशी जोडणे तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान तालुक्यातील युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. आगामी काळात युवासेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
युवासेनेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, ‘किल्ले बनवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून गड-किल्ले संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. हे दोन्ही उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्याचे नियोजन करण्यात आले यावे ळी रुपेश निगुडकर धिरज कदम गणेश बिल्लार नागेश घोसाळकर राहुल पारेख अविनाश म्हाप्रळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.