पोलादपूर (शैलेश पालकर) – तालुक्यातील रानबाजीरे पाण्याचा साठा नोव्हेंबरमध्ये 98 टक्के असतो; यंदा सप्टेंबर महिन्यातच पाऊस थांबला तेव्हा पाण्याचा साठा 98 टक्के होता. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नजीकच्या काळामध्ये याचा अपव्यय टाळण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना, खार जमीन विकास आणि फलोत्पादन मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावांमधील धडाकेबाज मित्र मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त नवरात्रौत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ना.गोगावले यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अर्थ व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, पं.स. सदस्य अनिल दळवी, उद्योगपती रामदास कळंबे, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथशेठ उतेकर, युवासेना संपर्कप्रमुख विजय शेलार, उद्योजक अखलाकभाई पानसरे, माजी पं.स. उपसभापती संभाजी साळुंखे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी माजी पं.स. उपसभापती संभाजी साळुंखे यांच्याकडून पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील सांडपाणी सावित्री नदीच्या पात्रातून लोहारे येथे येत असल्याची केलेली तक्रार योग्य असल्याचे सांगितले. नगरपंचायतीचा नाइलाज असला तरी नदीचे पाणी वाहात आहे. भविष्यात या समस्येवर उपाय निश्चितपणे करणार, अशी ग्वाही ना. गोगावले यांनी दिली.

शुभारंभापूर्वी मनसे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते राज पार्टे यांनी सदीच्छा भेट देऊन धडाकेबाज मित्र मंडळाचा ३०० वा वर्धापन दिन साजरा होवो अशी देवीचरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी धडाकेबाज मित्र मंडळ लोहारेचे अध्यक्ष शरद साळुंखे, कार्याध्यक्ष प्रदीप नरे, उपाध्यक्ष निलेश साळुंखे, सचिव राकेश साळुंखे, खजिनदार दत्ताराम पवार तसेच धडाकेबाज मित्र मंडळ लोहारमाळ नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीधर नरे,कार्याध्यक्ष सुयश साळुंखे, कार्याध्यक्ष भूषण देशमुख, उपाध्यक्ष नितीन पार्टे, सचिव साईराज पवार, खजिनदार संभाजी जाधव, सहसचिव यश चव्हाण, सहखजिनदार दिनेश दराडे, सल्लागार दीपक उतेकर, किरण देशमुख, सल्लागार जितेंद्र शिंदे आदींनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला.
याप्रसंगी आमची माती आमची माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष अरुण मोहिते, फौजी नरेंद्र डिगे, मंडळाचे सदस्य व केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती प्राप्त प्राथमिक शिक्षक सुनील पवार, डॉ.राजेश शिंदे, २५ वर्षांनंतर दहावीची परिक्षा देऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी सेविका, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनी, साईसेवक चव्हाण, शक्ती तुरा नाचाचे शक्तीवाली शाहीर
वृदाली दळवी महाडिक, तुरेवाले शाहीर सुशांत जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.