चिपळूण : जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत नागरी दलितोत्तर योजनेमधून चिपळूण नगरपरिषदेच्या मालकीच्या मटण व मच्छी मार्केट इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नगराध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ, मुख्याधिकारी श्री. संजय जाधव आणि उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी चिपळूण नगरपरिषदेचे विविध सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नूतनीकरणाच्या कामामुळे मटण व मच्छी मार्केटमधील सुविधा अधिक चांगल्या होण्यास मदत होणार असून, व्यापारी आणि नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चिपळूण नगरपरिषदेचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या मटण व मच्छी मार्केट भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न!
