लांजा : आमदार किरणभैय्या सामंत यांनी दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला लांजा तालुक्यातील शिवसैनिक व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे.
वेरळ शिवसेना शाखेच्या वतीने विविध बंधारे बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, सभापती मानसी आंबेकर, जि. प. सदस्य मनीषा राखण, पं. स. सदस्य दीपाली साळवी, ग्रा. प. सदस्य शरद चरकरी, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच इक्बाल टोळे, वेरळ शाखाप्रमुख सीताराम पातेरे, उपशाखाप्रमुख दीपक खामकर, शामसुंदर पाताडे, महिला शाखा संघटिका स्मिता खामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण सर तसेच सर्व मान्यवर, शाखा संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
