चिपळूण : मोरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. संचिता सचिन जाधव यांना पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’मध्ये ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल शिवसेना नेते तथा सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा. विनायकजी राऊत यांच्या हस्ते नवरात्रोत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील देवीदर्शन दौऱ्यादरम्यान त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राऊत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणले की, ग्रामकारभार सांभाळताना नागरिकांच्या अपेक्षा, मूलभूत सुविधांचे प्रश्न, प्रशासकीय मर्यादा आणि विकासकामांचे नियोजन अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकविश्वास, पारदर्शक कारभार, प्रशासनाशी समन्वय आणि सर्वपक्षीय सहकार्याच्या बळावर गावाचा सर्वांगीण विकास साधणे महत्त्वाचे आहे. ग्रामविकासात राजकीय मतभेदांपेक्षा गावाचे हित मोठे मानून सर्वांनी एकत्र काम करणे, हीच सक्षम स्थानिक नेतृत्वाची खरी कसोटी आहे.
दरम्यान, देवीदर्शन दौऱ्यावेळी मोरवणे ग्रामस्थांच्या वतीने मा. विनायकजी राऊत यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या समयी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन भैय्या कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, सरपंच सुरेंद्र बाबा शिंदे, बाबा भाई शिंदे, विनायक शिंदे, सचिन जाधव, जयवंत अदवडे, पांडुरंग पिलावरे यांच्यासह ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.
सौ. संचिता जाधव यांचा हा सन्मान ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरो, हीच सदिच्छा!