चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-खेड विभागाचे उपजिल्हा संघटक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्री. उमेश दगडू गुरव यांचा शिवसेना नेते तथा सचिव आणि माजी खासदार मा. विनायकजी राऊत यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील देवीदर्शन दौऱ्यादरम्यान त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विनायक राऊत यांनीही शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
ग्राहकांची फसवणूक, अन्यायकारक व्यवहार आणि तक्रारींच्या निवारणासाठी ग्राहक संरक्षण कक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. नव्या संघटनात्मक जबाबदारीच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, त्यांच्या हक्कांविषयी जागृती करणे आणि अन्यायाविरोधात प्रभावीपणे पाठपुरावा करणे, ही उमेश गुरव यांच्यासमोरील महत्त्वाची जबाबदारी असेल असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, संघटक तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटक राजूशेठ देवळेकर, शहरप्रमुख सचिन भैय्या कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्राहकांचे हक्क, जनतेचा विश्वास आणि अन्यायाविरोधातील संघर्ष अधिक प्रभावी करण्यासाठी उमेश गुरव यांची नियुक्ती संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरो, हीच सदिच्छा!
