लांजा : कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पाण्याचा साठा वाढविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जावडे येथील हेरिटेज प्रयोगभूमितील विद्यार्थ्यांनी चार बंधारे बांधल्याने जावडे, रावारी , बापेरे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .
हेरिटेज संस्थेचे संस्थापक संतोष कांबळे व अध्यक्षा ॲड. अपर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्मल ग्रामपंचायत जावडे यांच्या सहकार्यातून हेरिटेज प्रयोगभूमीतील न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच माध्यमिक आश्रम शाळा जावडे या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून जावडे येथे वाहळावर चार बंधारे बांधले यामुळे भविष्यात जावडे , रावारी व बापेरे गावातील पाणी टंचाई कमी होऊन पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्याचा फायदा भातशेती तसेच फळबागा यांना देखील होणार आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
यावेळी जावडे ग्रामपंचायतीचे प्रशासक अजय धावडे, ग्रामविकास अधिकारी पूनम कुंभार, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण शिंदे तसेच दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
हेरिटेज प्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांनी जावडे येथे बांधले चार बंधारे…
