लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा तालुक्यातील भविष्यातील तीव्र पाण्याच्या दुष्काळ परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आणि आमदार कीरण सामंत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तालुक्यात जलसंधारणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी तब्बल ११४५’वनराई बंधारे’ बांधण्यात आले असून, यामुळे तालुक्याला पाणीटंचाईतून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
यंदा पाऊस कमी पडला असल्यामुळे भविष्यात पीण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार असल्याने येणा-या संकटावर मात करण्याची पाणी अडवाआणि जिरवा हा उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे.दरवर्षी पेक्षा यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती लक्षात घेऊन, पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून ते जमिनीत जिरवणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार नियोजनबद्ध आराखडा आखून तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्याचा विक्रम करण्यात आला आहे.
आमदार कीरण सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यात प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांनी ३१८ग्रामपंचायत व माविम बचतगट, ६७ग्रामपंचायत व अंगणवाडी १२०पशुसंवर्धन विभाग १ ग्रामपंचायत व उमेद बचतगट ,५५७तालुका कृषी कार्यालय ८२असे विविध शासकीय विभाग व प्रत्येक गावातील ग्रामस्थ यांचे मार्फत श्रमदान व लोक सहभागातून बंधारे बांधण्यात आले तालुक्याला यंदा ९००बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट होते. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आवश्यक बंधारे बांधकाम साहीत्य पुरवून सदर बंधारे बांधण्यात आले आहेत या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जागच्या जागी अडवले जाणार आहे. यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तर परिसरातील विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) यांची भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याची माहीती देतांना तालुक्याचे गटविकास अधिकारी गिरी यांनी सांगितले याबाबत आमदार कीरण सामंत यांच्या या दूरदृष्टीचे आणि कार्यपद्धतीचे तालुक्यातून जोरदार कौतुक होत आहे.