लोटे : लोटे येथील एका आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनीने महाविद्यालय परिसरातच आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची घटना आज शनिवार दि.१७ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सदर घटनेनंतर लोटे पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळबणी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

याबाबत मृत विद्यार्थिनीचे नाव, आत्महत्येचे कारण इत्यादी गोष्टींबाबत अद्याप अधिकृत खुलासा झाला नसून लोटे पोलीस अधिक तपास करीत आहेत.