चिपळूण : शहरातील प्रसिद्ध बाजारपेठ मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शेखरजी निकम सर यांनी भेट देऊन श्री वाघजाई मातेचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना व भाविकांना नवरात्री उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार साहेबांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
यावेळी चिपळूण नगरपरिषद उपनगराध्यक्षा सौ. रूपालीताई दांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मा. जयंतशेठ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शेखर निकम मित्र मंडळ अध्यक्ष संदीप जागुष्टे, शहर सरचिटणीस मनोज जाधव, शहर उपाध्यक्ष अनिकेत ओतारी, अल्लाद यादव, दादू गुडेकर, प्रथमेश डाकवे, विश्वनाथ कांबळे, कपिल महापुस्कर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, राकेश दांडेकर, तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्योजक मनोज भोजने, सुभाष भोजने, माणिक शिंदे, अभिषेक राजापूरकर, पप्या ओतारी, अक्षय ओतारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
