मुंबई : महाविकास आघाडी बैठक झाली त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्यात चर्चा झाली, आदरणीय शरद पवार साहेबांनी आम्हाला मोर्चात सहभागी होण्याची सूचना दिली आहे. आज त्याच अनुषंगाने मी मुंबई नवी मुंबई ठाणे पदाधिकारी बैठक बोलवली आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की,सध्या राज्यात आणि देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे कठीण झाले आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात भूमिका घेतली की यंत्रणांचा वापर करून दडपशाही सुरू होते आणि संबंधित व्यक्तीची बदनामी केली जाते,जे जे मोर्चे होतील त्या मोर्चात आम्ही सहभागी असणार आहोत,४ तारखेचा मोर्चाला पक्षाचा झेंडा न घेता पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतील,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की,मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पाळलेली नाहीत. मनोज जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली असतानाही गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कारवाया सुरू आहेत. हे दबावतंत्र लोकशाहीला घातक आहे, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ५ तारखेला राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात प्रशासनाला निवेदने देण्यात येणार आहे.सोमेश्वरची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ऐनवेळी निर्णय फिरवण्यात आला. कारखान्याचे चेअरमन वेगळे झाले असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे भाजपविरोधात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक गणित जुळून आले असून आमच्या पुरोगामी विचारांचे पॅनल रिंगणात ताकदीने उतरले आहे. असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.