मुंबई : महाराष्ट्राचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रा. आदिती पोहरे यांनी प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, रजनीताई पाटील, AICC चे सरचिटणीस अविनाश पांडे, CWC सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. कल्याण काळे, खा. प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री विश्वजित कदम, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, AICC सचिव U.B. व्यंकटेश, B.M. संदीप, रेहाना चिस्ती, सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, गोपाल तिवारी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

प्रा. आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.

या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धाराशीव जिल्ह्यातील ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रभारी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्याचे काम करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रेहाना चिस्ती, बी एम संदीप, यु. बी व्यंकटेश, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार आदी उपस्थित होते.