चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : ११७ वर्षांची उज्वल सुवर्ण परंपरा लाभलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या चिपळूणमधील ३४व्या भव्य-दिव्य शोरूमचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते आणि लोकप्रिय निवेदक श्री आदेश बांदेकर यांच्या हस्ते कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ-पर्वावर अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले.

यावेळी पेढीचे मुख्य संचालक विश्वनाथ आणि आशिष पेठे तसेच आदित्य पेठे ,निरंजन पेठे,निल पेठे, मिहिर पेठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

शुभेच्छा देण्यासाठी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक अंकुश आवले, माजी उपनगराध्यक्ष मिलिंद कापडी,अर्बन बँकेचे संचालक सतीश खेडेकर, निहार गुडेकर,उद्योजक सचिनभाई कदम आदी मान्यवर, हितचिंतक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अभिनेते आदेश बांदेकर यांनी चिपळूणचे ग्राहक वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूमला भरभरून प्रतिसाद देतील अशा शब्दात सदिच्छा दिल्या.