खेड : सामाजिक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल खेड येथील समाजसेवक अहमद दाऊद बांगी यांना रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे झालेल्या भव्य सोहळ्यात ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. फाउंडेशनचे अध्यक्ष मयुर ढोकचौळे यांच्या हस्ते त्यांना गिफ्ट, ट्रॉफी, शाल, प्रमाणपत्र, बॅच आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. बांगी यांनी सामाजिक कार्यात कौशल्यपूर्ण, सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने दिलेल्या योगदानाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सन्मानाबद्दल खेड तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते वैभव खेडेकर व भारतीय जनता पार्टी वाहतूक ट्रान्सपोर्ट सेलचे कोकण विभागचे अध्यक्ष संतोष नलावडे व वाहतूक सेलचे जिल्हा अध्यक्ष मधुकर आंब्रे, रिक्षा सेलचे तालुका अध्यक्ष व छत्रपती श्री शिवाजी महाराज रिक्षा चालक व मालकचे संस्थापक अध्यक्ष विशाल कापडी व सर्व रिक्षा चालक मालक यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.