खेड : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाचे महत्व कृतीतून समजावे या उद्देशाने तालुक्यातील तळे चिचंवाडी परिसरात ग्रुप ग्रामपंचायत तळे चिंचवाडी व ग्रामस्थांच्या सहकार्याने तीन वनराई बंधारे बांधण्यात आले.शनिवार दिनांक 24.10.2026 रोजी हा उपक्रम राबविला गेला.
जलसंधारण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ग्रामस्थांनी श्रमदान आणि सामाजिक बांधिलकी जपत आदर्श घालून दिला. चिंचवाडी उद्भव विहिरीजवळ,चिंचवाडी पुलाजवळ,व कासारवाडी विहिरीजवळ वनराई बंधारे उभारण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे यामुळे भुजळपातळी वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला गेला.गावातील पाण्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे. यावेळी सरपंच शामराव मोरे, सदस्य भरत महाडीक, सदस्य शत्रृघ्न मोरे, ग्रामपंचायत अधिकारी रोहन क्षिरसागर, कर्मचारी मंगेश शिर्के, संतोष मोरे तसेच कृषी अधिकारी श्री. पडघन व तळे चिंचवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.