मंडणगड : लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि लोकशाहीविरोधी प्रवृत्तींच्या निषेधार्थ भाजप महायुतीच्या वतीने ठाणे येथे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव पदयात्रेत’ मंडणगड तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या यात्रेत कोकण पदविधर मतदार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य अजय दळवी तालुका भाजप अध्यक्ष दत्ताराम महाडिक महिला आघाडी अध्यक्षा श्रेया दळवी उपाध्यक्ष विजय दुर्गवले यांच्यासह बत्तीसहुन अधिक तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते.

यावेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकद आणि पक्षनिष्ठेचे दर्शन घडविले. भाजप महायुतीच्या या उपक्रमातून लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. ठाणे येथील या पदयात्रेत मंडणगड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग हा पक्ष संघटनेतील एकजुटीचा आणि सक्रियतेचा प्रत्यय देणारा ठरला.
लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट, संघटनात्मक बळ आणि जनहिताचा संकल्प, असा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून देण्याक आला.