मंडणगड : दिवाळी सणाचे औचित्य साधून गड-किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना मंडणगडच्या वतीने भव्य किल्ले सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘किल्ले बांधा… स्वराज्य जपा!’ आणि ‘आपल्या इतिहासाचा अभिमान… आपल्या किल्ल्यांचा उत्सव!’ हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३,३३३ रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी २,२२२ रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी १,१११ रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १२ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचायत समिती, मंडणगड येथे करण्यात येणार आहे.
मंडणगड तालुक्यातील सर्व शाळा, विद्यार्थी आणि युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन युवासेना मंडणगडच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. सूरज घोसाळकर, श्री. प्रशांत दिवेकर, श्री. आदित्य घोरपडे आणि श्री. सागर जाधव यांच्याशी संपर्क साधावा.