देवरुख : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) 2026 जाहीर झालेला आहे. सदर कार्यक्रमानुसार दिनांक 31/08/2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून सद्यस्थितीत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुरु आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दि.26/10/2026 पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करुन मा. भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी तसेच दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी यामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार सुधारीत कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
पुनरिक्षणाचा टप्पा सुधारीत कालावधी
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 13/11/2026
नोटीस कालावधी/ दावे व हरकती निकालात काढणे. 25/11/2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे30/11/2026 असा आहे.
मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या तपशिलांची खातरजमा करावी. नोंदींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करावा तसेच सुधारित कार्यक्रमानुसार नवमतदारांनी तसेच प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र असलेल्या नागरिकांनी वरील सुविधेचा फायदा घ्यावा व अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव सुनिश्चित करावे असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.