पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस करून त्यांना विश्रांती घेण्याची विनंती केली. सुप्रिया आता उत्तम प्रकारे तयार झाल्या आहेत, त्यामुळे आम्ही आणि त्या मिळून देश सांभाळू, आपण विश्रांती घ्यावी, असे पंतप्रधानांनी अत्यंत प्रेमाने आणि आदरपूर्वक शरद पवारांना सांगितले असल्याची माहिती पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अत्यंत आपुलकीने विचारपूस केल्याबद्दल पवारांनी मोदींचे आभार मानले आणि मी विश्रांती घेतो, असे सांगितले. सायंकाळी शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पंतप्रधानांच्या या फोनची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
