मंडणगड : देशातील लोकशाही व्यवस्था, सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि विकासप्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषवाक्याखाली भव्य पदयात्राचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश व कोकण विभागीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार ॲड. माधवी नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पदयात्रेत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष कृपाल कांबळे, प्रदेश महामंत्री राहुल कांबळे, प्रदेश सचिव प्रणाली सावर्डेकर,प्रदेश कार्यकारिणी मंत्री शिरीष रामदासी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव व सुरेश गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष वीरसिंग पारछा, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष विशाल खंदारे, उल्हासनगर जिल्हा महामंत्री कमल जाधव आणि उल्हासनगर महासचिव शशिकांत कायदे यांच्यासह कोकण विभागातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

भारताची जागतिक स्तरावर वाढती ताकद, देशाची प्रगती आणि महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल या पार्श्वभूमीवर देशाच्या विकासाला बाधा आणणाऱ्या तसेच लोकशाही प्रक्रियेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात जनजागृती करण्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.

या पदयात्रेच्या निमित्ताने भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशापासून जिल्हास्तरापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.