पाली (धम्मशील सावंत ) : जगातील महान राजे म्हणून अलौकिक कर्तृत्व गाजविलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 वा जयंती सोहळा शिवभक्तांकडून उत्साही वातावरण व प्रेरक उपक्रमातून साजरा करण्यात आला. शिव तेज मित्र मंडळ झोतिरपाडा – कोळीवाडा यांच्या वतीने शिवजयंती चे औचित्य साधून किल्ले रायगड ते गावी पायी धावत शिवज्योत मशाल आणण्यात आली. तरुण व तरुणींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी विविध उपक्रमांनी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. दरवर्षी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तरुण, ग्रामस्थ व शिव प्रेमी यांच्या पुढाकाराने
आणण्यात येते. यावर्षीही हातात धगधगती शिवज्योत, खांद्यावर भगवा ध्वज, डोक्यावर रखरखत्या सूर्याची काहिली, आणि मुखात जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी चा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात शिवज्योत आणण्यात आली. या शिवज्योतीचे मोठ्या भक्तिभावाने जागोजागी स्वागत करण्यात आले. या साहसी उपक्रमात सिद्धेश भोय, बाळू पाटील, राम पाटील, रिंकू तरे, योगेश तरे, दिपेश भोय, निशांत तरे, धीरज कोळी, देवर्ष कोळी, आशुतोष पाटील. भार्गव तरे, मनोज कुथे, भारत कुथे , रोहन पाटील , विराज पाटील, रोशन पाटील , राज भोय, स्वराज पाटील, दीपक कुथे, किरण कुथे , साजन कुथे, प्रमय पाटील, सरिता पाटील , आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शिवजयंती निमित्त विविधांगी वेशभूषा, व अन्य प्रेरक कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अशोक भोय, संतोष कोळी, मोहन भोय, विजय भोय, महेंद्र तरे, पुंडलिक कोळी, संजय भोय, सुनील पाटील,सरिता पाटील,भास्कर कोळी, निखिल पाटील, मोहन पाटील, यदिश कुथे, पविन कोळी, हितेश भोय, सुनील कुथे, सोपान भोय, कमलाकर कोळी, दिपेश भोय, दत्ता तरे, प्रमोद तरे, प्रशांत तरे, देवश तरे, राजा तरे,ओम प्रकाश भोय, सदानंद तरे आदिसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.