श्रीवर्धन : कोकण मराठी साहित्य परिषद,श्रीवर्धन शाखेच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री दत्त मंदिर सभागृह,श्रीवर्धन येथे ‘दीपसंध्या’ हा गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमासाठी श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अॅड.अतुल अरविंद चौगुले हे प्रमुख अतिथी लाभले होते.प्रतिमा पूजन झाल्यावर कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख सादरकर्ते श्री.गजानन करमरकर व डाॅ.कु.चिन्मयी ज.मुरुडकर होते.तर त्यांना पार्थ पेंडसे,अविनाश गोगटे,सुनिल यादव,प्रसाद पेंडसे यांनी संगीताची उत्तम साथ केली.या कार्यक्रमाची संकल्पना सौ.विभावरी करमरकर यांची होती तर प्रसाद जोशी यांनी निवेदन केले.कार्यक्रमात अभंग,भक्तीगीते,भावगीते,नाट्यगीते आदिंची रेलचेल होती.या सा-या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.श्री.गजानन करमरकर यांनी गायिलेल्या भैरवीला तर रसिक श्रोत्यांनी स्वतः सहभागी होऊन जोरदार साथ दिली.
कोमसाप श्रीवर्धनच्या अध्यक्षा सौ.सीमा रिसबूड व उपाध्यक्ष प्रसाद जोशी हेही यावेळी उपस्थित होते.