दापोली : सकल हिंदू परिवार दापोली तर्फे २९ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली येथील श्री राधाकृष्ण मंदिर येथे ५१ श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज संघटित आहे. तो अधिक बलवान व्हावा आणि बंधुत्व ,संघभावना, शांतता, समृद्धता ,ऐक्य या गोष्टींची वृद्धी व्हावी या उद्देशाने हिंदू समाजा मधील विविध ५१ ज्ञातीच्या प्रमुखांना या महासत्तनारायण पूजेला बसण्याचा बहुमान मिळणार आहे. अशी माहिती सकल हिंदू परिवार दापोलीचे प्रमुख मिलिंद शेठ यांनी दिली.
महासत्यनारायण पूजेचा महोत्सव हा शंभर टक्के पर्यावरण पूरक असून सर्व सण उत्सव अशा पद्धतीनेच पर्यावरण पूरक करण्यात यावे या दृष्टिकोनातून प्राधान्य क्रमाने पारंपरिक पद्धतीने ५१ महासत्यनारायण पूजेचा घाट घालण्यात आला असून या पूजांचे निर्माल्याचे विसर्जन देखील पर्यावरणपूरक पद्धतीने विधिवतपणे निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे . अशी माहिती मिलिंद शेठ यांनी दिली.
५१ श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने ,सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत….महिलांचे भजन मंगळागौर
आणि पुरुषांचे सुश्राव्य भजन संगीत (भारदे गुरुजी आणि मंडळी) अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दापोली तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने या सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाकरिता सायंकाळी चार ते सात या वेळेमध्ये तमाम ज्येष्ठ नागरिक,बंधू ,भगिनी आणि बालक ,बालिका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू परिवारातर्फे करण्यात आले आहे.