सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सातेरी मंदिर परिसरात प्रसिद्ध ओंकार हत्तीचे आगमन झाले आहे. ओंकार हत्ती गावात आल्याची बातमी समजताच त्याला पाहण्यासाठी तळवडेसह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, नागरिकांची ही अफाट गर्दी हत्तीच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. गर्दी आणि गोंधळामुळे हत्ती बिथरण्याची भीती व्यक्त केली जात असून, हत्ती बिथरल्यास अनुचित घटना घडण्यासह जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन केले जात आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- लांजा तालुक्यात जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी, तिघे जखमी…
- क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी आवश्यकता असलेल्या संकुलांना पुनर्वितरित करावा;मंत्रिमंडळ मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करा…
- महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस, संजय राऊतांनी इतिहास तपासावा; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढले वाभाडे…
- देशाचे संविधान मोदी-शाह सरकारकडून मोडीत काढण्याचे काम, संविधान वाचले तर देश वाचेल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
- नगराध्यक्षांच्या उपस्थितीत शिरळ विद्याभारती शाळेत संविधान दिन साजरा..