मंडणगड : भारतीय आदिवासी समाजाचे महानायक, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाजपा मंडणगडच्या वतीने पंदेरी आदिवासी पंचक्रोशी येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आदिवासी बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पंदेरी पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपा मंडणगडच्या वतीने उपस्थित आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले. कार्यक्रमाला पंदेरी पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपा मंडणगडच्या वतीने उपस्थित आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. वसंत ताम्हणकर, भाजपा मंडणगड तालुकाध्यक्ष श्री. दत्ताजी महाडिक, तालुका सरचिटणीस ॲड. सुशीलजी दळवी, तालुका उपाध्यक्ष श्री. विजय दुर्गवले, श्री. राजू पवार, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पंदेरी आदिवासी बांधवांच्या अध्यक्षांनी आदिवासी वाडीवर अशा स्वरूपाचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच समाजातील बांधवांशी संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली. स्थानिक आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.