मंडणगड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि माझ्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत देव्हारे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
तसेच मंडणगड पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते श्री. अनिलशेठ रटाटे यांच्या विशेष प्रयत्नाने साखरी ग्रामस्थांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे मंडणगडमध्ये उबाठा गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिताताई केंद्रे, शिवसेना दापोली विधानसभा संपर्कप्रमुख श्री. सुधीरजी कदम, सहसंपर्कप्रमुख श्री. महेशजी गणवे, मंडणगड तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतापदादा घोसाळकर, मुंबई मंडणगड तालुका सहसंपर्कप्रमुख श्री. तुकारामजी गायकवाड, मुंबई तालुका संघटक श्री. विश्वासजी शिंदे, शिवसेना गटनेते श्री. अनिलशेठ रटाटे, पंचायत समिती सदस्या सौ. दिप्तीताई घडशी, तालुका समन्वयक श्री. जितेंद्र दवंडे, उपतालुका प्रमुख श्री. संजीवजी येसावरे, उपतालुका संघटक श्री. अजय शिगवण, श्री. अनंत बांद्रे, शिवसेना सचिव श्री. सिद्धेश देशपांडे, युवासेना तालुकाध्यक्ष श्री. विकास पवार, उपतालुकाधिकारी श्री. सुरज घोसाळकर, विभाग संघटक श्री. संतोष धाडवे, मुंबई युवासेना उपतालुका संघटक श्री. विराज गायकवाड, विभाग संघटक श्री. रुपेश म्हाप्रळकर, श्री. अतुल कदम, श्री. वसिम चिपोळकर, उद्योजक श्री. सुभाष भागडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
