मुंबई : जी-उत्तर (धारावी) विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक(प्र) सन्मा.संतोष वावेकर हे मुंबई महानगरपालिकेतील 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन दि.28 फेब्रुवारी 2026 पासुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तप्रित्यर्थ आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा यथोचित सन्मान सोहळा जी उत्तर विभागातील पर्यवेक्षकीय कर्मचारी,अधिकारी यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल धारावी मधील सभागृह या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्री किरणसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सुरुवातीला श्री वावेकर यांना शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याकरिता आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले,तद्नंतर श्री वावेकर यांच्या मुलीने स्वागत गित गावुन सर्वांचे स्वागत केले तर याच गायलेल्या गाण्यातून श्री वावेकर यांचे अभिष्टचिंतन केले तद्वतच सभागृहात एक मंगलमय वातावरण निर्माण झाले.
या मंगलमय वातावरणामध्ये श्री वावेकर यांच्या सेवा काळातील त्यांच्या कारकिर्दीतला जीवनपट स्क्रीन वर दाखवुन त्यांच्या भूतकाळाचे सिंहावलोकन केले गेले.
श्री वावेकर यांचा भुतकाळ लक्षात घेता गरिबीतून आलेले हे कुटुंबीय मुंबईत येऊन स्थिरावले आणि शैक्षणिक प्रगती करुन श्री वावेकर यांनी
ITI, Dip.SI, BA, MA LLB अशा पदव्या प्राप्त करुन मुंबई महानगर पालिकेत एक कामगार कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, ते सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक पदी श्री वावेकर हे कार्यरत होते.
आपल्या शिक्षणासोबत त्यांनी संगीत कला सुध्दा जोपासली आहे. आजच्या त्यांच्या सन्मान सोहळ्यात त्यांच्या मुलाने हिंदी गाणे गावुन उपस्थितीतांचे मनोरंजन केले.
तसेच त्यांच्या दोन्ही मुलांनी सुध्दा उच्च शिक्षण घेतले आहे,तर त्यांची धम्मपत्नी यांनी श्री संतोष वावेकर यांच्या बाबतीत भावनिक मनोगत व्यक्त केले ते उपस्थितीतांना भावले, तसेच त्यांच्या पत्नी या उत्तम शिक्षिका आहेत. श्री वावेकर यांनी एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत इतरांनी आदर्श घेण्याईथपर्यंत त्यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक,संगितमय,कौटुंबिक प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवल्याचे दिसुन येत आहे.
सत्काराला उत्तर देताना श्री वावेकर कामगार वर्गाला उद्देशुन म्हणाले की मी जी शैक्षणिक प्रगती केली आहे ती फार कष्ट करुन आणि नोकरी करता करता पुढील शिक्षण घेतले आहे म्हणून हे दिवस मला बघायला मिळाले,
आपण सुध्दा अशी प्रगती करुन इच्छित स्थळी पोहचू शकता,त्यासाठी मेहनत आणि चिकाटी हवी.!
श्री वावेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेवानिवृत्त,आणि कार्यरत अधिकारी,कर्मचारीवर्ग उपस्थितीत होते,तसेच सन्मा.नगरसेवक श्रीमती मोरे मॅडम या सुध्दा उपस्थितीत राहून श्री वावेकर यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री वावेकर यांना त्यांच्या अनेक सहकारी,मित्रमंडळी,कामगार वर्ग, अधिकारी नातेवाईक यांजकडुन सदिच्छा भेट वस्तु देण्यात आल्या,त्याला प्रतिसाद म्हणुन श्री वावेकर आणि कुटुंबीय यांजकडून प्रत्येकाला श्रीफळ,शाल आणि पेन देवुन त्यानी सुध्दा पाहुणचार केला,व उपस्थितीतांचे जाहीर आभार मानले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
