तळवली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, संकल्पनाधारित व स्पर्धात्मक शिक्षण मिळावे या उद्देशाने तळवली येथे ‘मेरिट क्लासेस’ या नव्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ सोमवार दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तळवली हायस्कूल समोर, तळवली येथे आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अमोल जड्याळ सर , ज्येष्ठ व्यावसायिक प्रकाशजी चव्हाण , ज्येष्ठ समाजसेवक प्रदीपजी चव्हाण तसेच श्रीनाथ कुळे सर , संजय कुळे सर , अभिजित केतकर , प्रभाकर चव्हाण, सुरेश चव्हाण , नरळकर तसेच कोवळे कुटुंबीय, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करून वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

‘मेरिट क्लासेस’चे संस्थापक देवेश कोवळे हे विज्ञान शाखेतील पदव्युत्तर (M.Sc. – Microbiology) शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्याचा संकल्प केला आहे. गावातील व परिसरातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संकल्पना भक्कम व्हाव्यात व ते शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धात्मक बनावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या वर्गामध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांची सुविधा देण्यात येणार आहे. १ ली ते ४ थी विशेष वर्ग घेण्यात येणार असून , १० वी साठी विशेष उन्हाळी बॅच सुरू करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना मंथन परीक्षा, शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षा तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षा यासाठी विशेष मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती देवेश कोवळे यांनी दिली. नियमित चाचण्या, वैयक्तिक लक्ष, संकल्पनांवर आधारित अध्यापन व प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना प्रदीप चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे नमूद केले. पालकांनीही अशा दर्जेदार मार्गदर्शन वर्गाची गावात आवश्यकता असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

प्रवेश प्रक्रिया सुरू असून अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 7218411517 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH