रसायनी (राकेश खराडे ) : जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी” दक्षिणपिठ – नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी खालापूर तालुक्यातील साजगाव धाकटी पंढरी समोरील मैदानावर हजारो अनुयायांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात सकाळी १०:०० पासून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांन समवेत भव्य दिव्य अशी शोभा यात्रेसोबत विविध कला पथकांच्या उपस्थितीत वसंत कुंज साजगाव ग्रामपंचायत ते साजगाव धाकटी पंढरी या मार्गाने झाली.या शोभायात्रेत रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांची एक किलोमीटर लांबीची लांबलचक रांग लागल्याचे पहावयास मिळाले.
या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांना ५० मोफत कपाटांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित मान्यवर, भाविक भक्त गण व हितचिंतकांनी घेतला. यावेळी कार्यक्रम ठिकाणी हजारो भाविक भक्तगण आणि बालक यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची उपासक दीक्षा घेतली.
जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ज. न. म. प्रवचनकार भूषण सुलभा हरेर यांनी प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर ज.न म. प्रवचनकार यांच्या माध्यमातून उद्धबोधक प्रवचन करण्यात येणार आले. या पादुका दर्शन सोहळ्यासाठी कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद, विक्रम साबळे
उप नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे उपसभापती भाई शिंदे , सरपंच विनोद खवळे,माजी नगराध्यक्ष सुनील गोटीराम पाटील,माजी सभापती रमेश पाटील,वासांबे मोहोपाडा माजी सरपंच शशिकांत मुकादम,अनिल सानप,किशोर पाटील, राजू गायकवाड, सुवर्णा मोरे, रेश्मा राजेश पाटील, स्वेला तुषार अहेर, संदीप पाटील, हरीश काळे, मयुरी सिद्धांत शेलार, कैलास म्हात्रे,शिवाजी नाले आबा पादुका दर्शन सोहळा दौरा प्रमुख,गणेश मोरे
मुख्यपीठ सहाय्यक पीठ प्रमुख दीपक कडव,मोहन शिंदे, सुनील वीर मुख्यपीठ युवा निरीक्षक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पादुका दर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी पीठ समिती , जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र कमिटी आणि भाविक भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा, शोभायात्रेसह समाजोपयोगी उपक्रम
