खेड : तालुक्यातील सुकीवली (चौधवाडी) येथे एका २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३१ जुलै) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व परशुराम राबते (वय २०, रा. सुकीवली चौधवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.