देवरुख : देवरुख शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या परशरामवाडी येथील बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नवीन कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (KT Weir) मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शिफारस पत्रासह देवरुख शहर पाणी पुरवठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली.
मंत्री महोदयांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कार्यालयाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या नवीन बंधाऱ्यामुळे देवरुख शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक सक्षमपणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.