संगमेश्वर ( गौरव पोंक्षे ) : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा आंबव पोंक्षे गावात सत्कार करण्यात आला.
शिमगोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे होणाऱ्या गाव सभेत हा सन्मान करण्यात आला.गावातील खोत,गावकरी,मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सत्कार झाला.
दरम्यान या गावसभेत पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.सायबर क्राईम विषयी माहिती दिली.शिवाय काजू लागवडीतील,काजू बियांची चोरी टाळावी व परस्पर सहकार्य करावे असे आवाहन केले.४० गावामध्ये आंबव पोंक्षे गाव खऱ्या अर्थाने तंटामुक्त असल्याचे नमूद करत ग्रामस्थांचे कौतुक केले. गावामधील असलेला एकोपा आणि शांततेची प्रशंसा केली.
यावेळी पोलीस पाटील सोनाली जाधव,गावकर मोहन भुवड,संदेश पोंक्षे,सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,सुरेश घडशी,संजय पकडे,रवी पकडे,दीपक शिगवण,राजेंद्र जाधव,गोपाळ चाळके,देवजी भायजे,आदीसह खोत,गावकरी,मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
