खेड ( चंद्रकांत बनकर ) : मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील काळकाई मंदिराजमोर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. ८ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मुंबईहून खेडकडे वेगाने जाणाऱ्या एका आलिशान कारने दुभाजक ओलांडणाऱ्या ॲक्टिव्हा स्कुटीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात भरण्यातील रहिवासी असलेले पाच वर्षीय बालक आरव अमोल पवार आणि ३७ वर्षीय अनघा अमोल पवार हे दोघे मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथे तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थानची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत जखमींना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. महामार्गावर दुभाजक ओलांडताना वाहनचालकांनी अधिक खबरदारी आणि सतर्कता बाळगण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनीही या संकटसमयी मदतकार्यात मोठे सहकार्य केले. सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH