खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात आज दुपारी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर नियंत्रण सुटून सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की कंटेनरचे चेसिस रस्त्यालगत तर लोखंडी सांगाडा खोल दरीत जाऊन पडला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणाला राष्ट्रीय महामार्ग विभागाने यापूर्वीच ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले असून येथे संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू असतानाही पुन्हा अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻