जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना धारेवर धरले आहे. सिलिंडर येत नाही तोपर्यंत २५ दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का ? वि’चित्रा’ ताई ? असा सवालही त्यांनी केला आहे.
आपल्या एक्स हँडलवर रोहिणी खडसे यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत की, काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले.
वि’चित्रा’ ताई म्हणाल्या की, सिलिंडर आहेत.. २५ दिवसांत मिळते सिलिंडर.. बुक करायला सांगा… अहो विचित्रा ताई… जर एका सामान्य गृहिणीच्या घराचा गॅस, आज संपला असेल तर त्यांनी काय करावं ? २५ दिवस वाट पहावी का ? बरं पाहतो वाट ! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का ? वि’चित्रा’ ताई ?
