खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत चालू असून आज दुसऱ्या दिवशीही पोलो कार पलटी होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत चालू असून काल एका कंटेनरने समोरील पाच वाहनांना चिरडून इनोव्हा कार मधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, ही घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशीही गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून सकाळी तीन कार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात एका पाठोपाठ ओव्हरटेक करत असताना त्यातील एक पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला, या कार मधील ओमकुमार बोरसे( वय 23),लय भारत (वय 22 ) आणि श्रेयांश शर्मा या तरुणांचा कार मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे तरुण आयआयटी पवई मुंबई येथील असल्याची माहिती मिळत आहे,
काल मुंबईहुन हे तरुण तीन कारने मुव्ही पाहण्यासाठी लोणावळा येथे आले होते ते आज सकाळी पुन्हा मुंबई कडे परतत असताना एक्सप्रेसवेवर त्या कारची रेसिंग लागली असून ओव्हरटेकच्या नादात त्यांची कार पलटी होऊन भीषण अपघात झाला,
या दोन दिवसात एक्सप्रेसवेवर सहा जणांचा मृत्यू झाला असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य ऍम्ब्युलन्सची टीम, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले,मात्र या कारचा चक्काचूर झाला आहे
गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात पोलो कार पलटी होऊन तिघांचा मृत्यू… दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू…
