पेण(प्रशांत पोतदार) : खेड भडवले ते बोरिवली अशी कोकणातून प्रवास करणारी एस टी बस क्रमांक एम एच २० बी एल २९४३ यामध्ये प्रवासी रविंद्र बाबुराव चव्हाण वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर आणि त्यांची पत्नी प्रवास आपल्या घरी निघाले होते. प्रवासा दरम्यान त्यांना झोप लागली त्यानंतर एस टी बस इंदापूरच्या पुढे आली असताना त्या महिलेला जाग आली तिने पतीला आवाज दिला परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, पती बेशुद्ध असल्याचे तिच्या लक्षात आले.

यावेळी एसटी वाहक व चालकांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी एसटी बस पेण उपजिल्हा रुग्णालयात आणली त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत असल्याचे घोषित केले.

चिंचवली खेड येथून सोबत निघालेले नवरा बायको यांच्या प्रवासा दरम्यान कोणतीही खबर न लागताच पतीची अचानक प्राणज्योत मावळल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सदर व्यक्ती नेमका कसा मृत झाला याचे कारणं अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळीं दाखल झाले. सदर घटनेची नोंद पेण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.